"मला शिवाजी व्हायचंय! हे पुस्तक मी वाचलं आणि मी शांत झालो, स्तब्ध झालो. खूप दिवसानंतर अंतर्मुख झालो. वादळापुर्वीची शांतता होती ती! माझा अभिमान, माझे राजे, माझे श्रद्धास्थान आणि अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं प्रेरणादायी जीवन नजरेसमोर उभं राहिलं. आयुष्यात पाहिजे तसं यश गाठण्यासाठी आणि आयुष्य सुंदर बनवण्यासाठी आवश्यक त्या तत्त्वांची महाराजांच्या इतिहासाशी सांगड घालणारं हे एक उत्तम पुस्तक आहे. हे तुम्हाला यशस्वी होण्याची प्रेरणा नक्कीच देईल."
© 2020 Vinod Mestry. All rights reserved.