आपण नोकरी सारखा secured मार्ग सोडून उद्योग का निवडला?
तर आपल्याला कुणाच्या हाताखाली काम करायचं नव्हतं. स्वतःचं काही घडवायचं होतं. आपल्याला वेळेचं विचारांचं आणि पैशाचं स्वातंत्र्य अनुभवायचं होतं. कुणाकडे नोकरी करायची नाही म्हणून आपण उद्योग निवडला. परंतु कित्येक वर्षे बिझनेस केल्यावर आपल्या लक्षात येतं की अजूनही नोकरीच करतोय. फरक इतकाच की आपल्या स्वतःच्या उद्योगात आपण नोकरी करतोय.
जर आज आपल्याशिवाय आपला बिझनेस चालत नसेल. जर सकाळी तुमचं ऑफिस, फॅक्टरी किंवा दुकान उघडून बंद करे पर्यंत तुम्हाला प्रत्येक कामात उपस्थित रहाव लागत असेल. जर तुमच्या शिवाय तुमचा बिझनेस चालत नसेल. तर माफ करा. आपण उद्योग करतोय या भ्रमात आपण जगत आहात. जर तुम्हाला सर्व कामांमध्ये सहभागी व्हावं लागत असेल. तर तुम्ही उद्योग नाही स्वयंरोजगार करत आहात. आणि या दोन गोष्टींमध्ये प्रचंड फरक आहे. उद्योजकांना स्वातंत्र्य अनुभवता यावं, आपल्या शिवाय चालणारी यंत्रणा निर्माण करता यावी आणि उद्योग विस्तरावर जास्तीत जास्त फोकस करता यावा या हेतूने या गोष्टींवर काम करून घेणारा प्रॅक्टिकल कोर्स आम्ही घेवून आलो.
Entrepreneur 2.0 - A Classroom Business Coaching Program
१० सत्रांमध्ये चालणारी ही कार्यशाळा गेल्या काही महिन्यांत उद्योजकांसाठी कंप्लीट टर्न अराऊंड ठरत आहे. उद्योगाची सद्यस्थिती, उद्योगाची पायाभरणी, संघ बांधणी, संस्था बांधणी आणि विकास या टप्प्यांवर हा कोर्स प्रॅक्टिकल काम करून घेतो.
काय शिकाल?
☑️उद्योगाचे अधिष्ठान शोधणे,
☑️उद्योगाची आरोग्य तपासणी
☑️व्हिजन, मिशन आणि व्हॅल्यू स्टेटमेंटस् ठरवणे
☑️सायंटिफिक रित्या १ ते ५ वर्षांचे Turnover ठरवणे
☑️Strategy ठरवणे. ॲक्शन प्लॅन तयार करणे.
☑️आठवड्याचे वेळेचे नियोजन करणे.
☑️माणसे नेमणे, त्यांना प्रशिक्षित करणे, त्यांचे परफॉर्मन्स अप्रेझल करणे, त्यांच्या मीटिंग आणि reporting system ठरवणे
☑️कामाच्या सिस्टीम आणि मॅन्युअल तयार करणे
☑️आपले प्रोडक्ट किंवा सेवा उत्कृष्ट बनवणे
☑️सेल्स आणि मार्केटिंग प्लान तयार करणे
☑️स्वस्त आणि सहज उपलब्ध तंत्रज्ञानाच्या मदतीने उद्योगाचा वेग वाढवणे.
☑️आर्थिक सद्यस्थिती शोधण्यापासून ते विविध फायनांशियल प्लॅन्स तयार करणे.
☑️Collaboration, Co-operation आणि Co-existance तत्वावर उद्योगाचा विस्तार साधणे.
या आणि अशा अनेक गोष्टींचे तयार साचे आम्ही या कोर्स मधून पुरवतो. तुम्ही तुमच्या डोक्यात असलेल्या गोष्टी या साच्यामध्ये उतरवत जायचं आणि १० सत्रांच्या या प्रवासात तुमच्या शिवाय चालणारी यंत्रणा तुम्ही तयार केलेली असेल.
ही कार्यशाळा अटेंड करून काय मिळवाल?
१) उद्योग आणि एकंदरीत आयुष्याबद्दल क्लियारीटी मिळेल.
२) बिझिनेसच्या कोअरवर काम करून पाया भक्कम होईल.
३) बिझिनेसचे सिस्टीम डेव्हलप करण्याचे साचे मिळतील.
४) विविध प्लॅन तयार करण्याचे साचे मिळतील.
५) उद्योगाची टाईमलाईन तयार करण्याचे टूल्स मिळतील.
६) येणाऱ्या काळात आवश्यक कौशल्ये आत्मसात करून स्वतःतील उद्योजकांचे नेक्स्ट व्हर्जन म्हणून अपग्रेड व्हाल.
७) हे सर्व मिळवण्यासाठी तुम्हाला लाखो रुपये खर्च करण्याची आवश्यकता नाही.
८) सगळ्यात महत्त्वाचं! ऑपरेटिव्ह कामांतून बाहेर पडून स्वतःच्या आणि उद्योगाच्या ग्रोथ वर लक्ष केंद्रित करू शकाल.
गेली ७ वर्षे आम्ही बिझनेस कोचिंग मध्ये आहोत. अनेक उद्योजकांना आम्ही वैयक्तिक कोचिंग देवून त्यांच्या उद्योगाला आकार द्यायला मदत करत आलो आहोत. परंतु अशा प्रकारची वैयक्तिक बिझनेस कोचिंग प्रत्येकाला परवडणारी नाही. म्हणून आम्ही या बिझनेस कोचिंगला क्लासरूम कोचिंग मध्ये आणण्याचा विचार केला. दीड वर्षे काम करून ही यंत्रणा निर्माण केली. उपयुक्त दर्जेदार साचे तयार केले आणि आम्हाला सांगायला आनंद वाटतोय की १३ नोव्हेंबर २०२१ रोजी आमची पहिली बॅच सुरू झाली आणि पुढच्या १८ महिन्यांतच आम्ही ७ बॅचेस पूर्ण केल्या आहेत आणि २१६ उद्योजकांच्या उद्योगांना अकार देण्याचे कार्य पार पाडले आहे.
Entrepreneur 2.0 हा केवळ एक कोर्स नसून एक चळवळ आहे. अतिशय माफक फी मध्ये दर्जेदार परतावा देणारा हा एक अद्वितीय कोर्स आहे.
तुम्हालाही जर तुमच्या उद्योगाच्या कोअर वर भक्कम काम करायचे असेल, उत्कृष्ट संघबांधणी करायची असेल, आपल्या शिवाय चालणारी यंत्रणा निर्माण करून वेळेचे, विचारांचे आणि पैशांचे स्वातंत्र्य अनुभवायचे असेल आणि उद्योगाला नेक्स्ट लेव्हलला घेवून जायचे असेल. तर आजच जॉईन करा Entrepreneur 2.0 आणि कर्तबगार उद्योजकांच्या या कुटुंबामध्ये सामील व्हा.