"मला शिवाजी व्हायचंय! हे पुस्तक मी वाचलं आणि मी शांत झालो, स्तब्ध झालो. खूप दिवसानंतर अंतर्मुख झालो. वादळापुर्वीची शांतता होती ती! माझा अभिमान, माझे राजे, माझे श्रद्धास्थान आणि अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं प्रेरणादायी जीवन नजरेसमोर उभं राहिलं. आयुष्यात पाहिजे तसं यश गाठण्यासाठी आणि आयुष्य सुंदर बनवण्यासाठी आवश्यक त्या तत्त्वांची महाराजांच्या इतिहासाशी सांगड घालणारं हे एक उत्तम पुस्तक आहे. हे तुम्हाला यशस्वी होण्याची प्रेरणा नक्कीच देईल."
"विनोद मेस्त्री हा मी ऐकलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलणाऱ्या उत्कृष्ट वक्त्यांपैकी एक आहे. महाराजांचे नेतृत्वगुण आणि तत्वांची आताच्या युगाशी उत्कृष्ट सांगड घालून तो करत असलेलं सदरीकरण तरुण पिढीसाठी महत्त्वाचे आहे. विनोदमुळे इतिहास एका नव्या अर्थाने कळू लागतो."
"आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक व्याख्याने ऐकली परंतु अशा प्रकारचं सदरीकरण कधी पाहिले नाही. अत्यंत उत्कृष्ट आणि मनाला भावणारं. अशीच उत्तमोत्तम व्याख्याने आपल्याकडून घडत राहोत. विनोद मेस्त्री यांच्या वक्तुत्वाच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेचा!"
“विनोद मेस्त्री यांच्या एकदिवसीय कार्अयशाळेत आमच्या मॅनेजर्ससाठी 'सुपरमॅनेजर', डॉक्टर्ससाठी 'सुपर डॉक्टर' आणि सेल्समन्ससाठी 'सुपर सेल्समन' हा अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धतीचा अद्वितीय प्रशिक्षणक्रम ठरला. पुणे आणि कोल्हापूरच्या टीममध्ये अमुल्य बदल घडवून आणला.”
"रेलिगेअर सेल्स टीम वर पनवेल इथे झालेल्या व्याख्यानाची अजूनही लोक आठवण काढतात. विनोद यांनी आम्हा सगळ्यांना इतिहासात नेवून आम्ही स्वतः ते सगळं अनुभवतोय असं वाटायला भाग पाडलं. अतिशय प्रेरणादायी, रोमांचकारक सादरीकरण आमच्या टीमसाठी प्रोत्साहन देणारं ठरलं ."
"आपल्या विखुरलेल्या आयडीयाजना शिस्तबद्ध स्वरूप देणारा, उद्योगाची घडी व्यवस्थित बसवून उद्योजकांना स्वातंत्र्य मिळवून देणारा, चाकोरीबाहेर जाऊन आपण ज्याच्या लायक आहोत ते साध्य करायला प्रवृत्त करणारा, उद्योगाला आणि आयुष्याला दिशा देणारा प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा उत्तम मार्गदर्शक, कोच म्हणजे विनोद मेस्त्री सर. माझ्या विखुरलेल्या उद्योगाला नवी दिशा आणि नवी उभारी विनोद सरांमुळे मिळाली आणि आत्ता इतिहास रचण्यासाठी मी सज्ज आहे."
"स्व ची ओळख करून देण्याचं खूप महत्त्वाचे आणि गरजेचं काम या कोर्समुळे झाले आहे. स्वतः बदला देश आपोआपच बदलेल त्याप्रमाणे स्वतःचे गोल ठरवता ठरवता आपण आपल्या देशाचे गोल देखील ठरवू शकू इतका आत्मविश्वास निर्माण झाला आहे. आजपर्यंत इतक्या बारकाईने मी मला कधीच बघितलं नव्हतं म्हणून आजपर्यंत मला माझ्यात जे दिसलं नाही ते आज फक्त विनोद सर आपल्या ह्या कोर्समुळे दिसलं. मला माझी नव्याने ओळख करून दिल्याबद्दल तुमचं आणि टीमचं खूप खूप आभार"
‘आय लीड माय लाईफ बेसिक’ या कोरमुळे फारच प्रभावित झालो आहे. या कोर्समध्ये शिकलेली प्रत्येक गोष्ट फॉलो करून स्वतःला त्याची सवय लावून घेत आहे. यामुळे मला पूर्ण विश्वास वाटतोय कि मी पाहिलेली प्रत्येक मोठी स्वप्ने मी पूर्ण करणार आहे. शेकडो पुस्तके वाचून जे ज्ञान मिळाले नसते ते या कोर्स मधून ४० दिवसांत मिळाले. त्याबद्दल मी आपला आयुष्यभर ऋणी राहीन.
Fans
Followers
Subscribers
Mala Shivaji Vhaychay
© 2020 Vinod Mestry. All rights reserved.