image
image

नमस्कार, मी विनोद अनंत मेस्त्री

  • लेखक | प्रशिक्षक | शिक्षक | प्रेरक | सल्लागार
मी तुमचा वैयक्तिक प्रशिक्षक होऊ शकतो!

श्री. विनोद मेस्त्री हे एक प्रसिद्ध उद्योजक, प्रेरणादायी वक्ता, सॉफ्ट-स्किल ​ट्रेनर, लाईफ-बिझिनेस कोच, लेखक आणि कवी असून गेले १८ वर्षे ते वरील विषयांवर तरूणांना, विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना मार्गदर्शन करत आहेत. आजपर्यंत त्यांनी १,२५,००० हून अधिक लोकांना वेगवेगळ्या विषयाअंतर्गत १३०० हून अधिक सेमिनार आणि कार्यशाळेमधून मार्गदर्शन दिले आहे.

आपल्या सर्वांसाठी त्रिकालबाधित प्रेरणा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर विनोद मेस्त्री यांनी गेले १० ​ वर्षे वाचन आणि लिखाण करून त्यांच्याबद्दल प्राविण्य मिळवलेले आहे. प्रत्येक गोष्टींत महान असलेल्या श्री. शिवाजी महाराजांच्या जीवनातील योग्य त्या तत्वांचा वापर करून प्रत्येक व्यक्ती हि त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि आर्थिक जीवनाचा "शिवाजी" होऊ शकते आणि त्याचे आयुष्य परिपूर्ण करू शकते यासाठी विनोद मेस्त्री यांनी "मला शिवाजी व्हायचंय" “इतिहासातून इतिहास घडवा” आणि "मराठा ३००" असे सेमिनार तयार करून शिवाजी महाराजांना एका वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी घेतली आहे.

image

आतापर्यंत महाराष्ट्रातील २३ जिल्हे, तामिळनाडू आणि मध्यप्रदेशमध्ये २००हून अधिक ठिकाणी त्यांची या वरील विषयांवर व्याख्याने झाली आहेत. काही कॉर्पोरेट आणि गव्हर्नमेंट कंपन्यांसाठी त्यांनी "कॉर्पोरेट शिवाजीराजे" हा सेमिनार घेऊन त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत केलेली आहे. या विषयांवर त्यांचे पुस्तकही प्रकाशित झालेले आहे आणि त्यास मराठी सुपरस्टार स्वप्नील जोशी यांची प्रस्तावना लाभली आहे. प्रसिद्ध मराठी उद्योजक श्री. अग्नेलोराजेश अथायडे (सेंट अँजेलोज कॉम्पुटर इन्स्टिटयूटचे संस्थापक) यांच्या आत्मचरित्राचे “समस्या ते संधी” नावाच्या पुस्तकाचे लेखन आणि शब्दांकन देखील यांनी केलेले आहे. १ जानेवारी २०१८ रोजी त्यांचे 'आय लीड मंत्र' नावाचे नवीन पुस्तक प्रकाशित झाले आहे. श्री. विनोद मेस्त्री यांची "श्री कॉमर्स अकॅडेमी" हि एक चेंबूर, मुंबईमधील नावाजलेली कोचिंग इन्स्टिटयूट मार्फत १६ वर्षे त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठीही "आय लीड माय लाईफ" आणि "शुभारंभ - एका नव्या जीवनाचा" या उपक्रमा अंतर्गत मदत केली आहेत.

महाराष्ट्र पोलिस नोकरीमध्ये असलेल्या पती-पत्नीमधील वाढते तणाव आणि घटस्फोट यांवर देखील त्यांनी "संवाद तुझा माझा" हा उपक्रम सुरु करून महाराष्ट्र पोलिसांची कुटुंब व्यवस्था भक्कम करण्यास मदत केलेली आहे त्यास महाराष्ट्राचे दिवंगत उप-मुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री. जीवनरंग-आय लीड ट्रेनिंग टीम मार्फत पोलिसांमध्ये नव्याने भरती होणाऱ्या लोकांसाठी आणि अधिकारी वर्गासाठी मृदू कौशल्यावर आधारित महाराष्ट्रातील १० पोलीस ट्रेनिंग सेंटर्स ठिकाणी ३-३ दिवसांचे ट्रेनिंग सेशन्स घेऊन पोलिसांना बौद्धिक, सामाजिक, आर्थिक, वैयक्तिक लाभ मिळवून देण्यास मदत करत आहेत. त्याखेरीज मुंबई पोलीस दक्षिण विभाग, मुंबई पोलीस समाज सेवा शाखा, मुंबई पोलीस समाज सेवा शाखा, महाराष्ट्र पोलीस अकादमी, पोलीस हेड क्वार्टर्स, सशत्र पोलीस विभाग येथे आजपर्यंत जवळपास १५००० पेक्षा जास्त पोलिसांना मार्गदर्शन केलेले आहे.

एक सक्षम पिढी घडवण्याची ताकद शिक्षकांमध्ये असते आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कौशल्ये शिक्षकांमध्ये विकसित करण्यासाठी ​"सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी शिक्षक" या कार्यशाळेतून ते ६,५०० पेक्षा जास्त शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचे काम करत आलेले आहेत.

श्री. विनोद मेस्त्री यांनी आतापर्यंत प्रसिद्ध सूत्रसंचालक उत्तरा मोने, समाजसेवक डॉ. अभय बंग आणि सिंधुताई सकपाळ, पोलीस महानिरीक्षक श्री. विश्वास ​नागरे पाटील, मराठी सुपरस्टार स्वप्नील जोशी, प्रसिद्ध सरकारी वकील श्री. उज्वल निकम आणि कॉर्पोरेट वकील श्री. नितीन पोतदार, ऍडगुरु भरत दाभोलकर, संगीतकार सलील कुलकर्णी, पोलीस डीजी श्री. अरविंद इनामदार, श्री. संजय गोविलकर (आतंकवादी कसाबला जिवंत पकडणारे), ई लोकांच्या मुलाखती आणि कार्यक्रमांचे सूत्र संचालन उत्कृष्टरित्या केलेले आहे.

“शिवाजी महाराजांची नीती आणि उद्योग” या विषयावर त्यांची १०७.१ अस्मिता वाहिनी वर ५ भागांत मुलाखत झालेली आहे. तसेच शिवाजी महाराजांची तत्त्वे आणि त्यांचा आजच्या युगात वापर या आशयावर bolmarathi.in या वेब पोर्टलवर मुलाखत झाली आहे.

सोशल मिडीयावर त्यांच्या व्हिडीओजना एकत्रित ४० लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. म्हणजे या मध्यमामार्फत त्यांनी ४० लाखांहून अधिक लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आहे.

“आय लीड ट्रेनिंग्स अँड कन्सल्टिंग”चे संस्थापक म्हणून त्यांनी विविध माध्यमातून लाखो लोकांच्या आयुष्याला स्पर्श केला आहे आणि सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी आवश्यक एक सक्षम पिढी घडवण्यासाठी ते सतत झटत आहेत.

एक बिझिनेस कोच म्हणून लघु आणि मध्यम उद्योग समूहांना त्यांचे सिस्टिम्स निर्माण करण्यासाठी आणि विकास साधण्यासाठी ते बहुमुल्य मार्गदर्शन करत असतात.

भारतातील व्हाट्सअँप वर चालणारा पहिला नेतृत्व विकास कोर्स सुरु करण्याचा मान त्यांना जातो.

त्यांच्या कार्याची दखल घेवून ऑल इंडिया मिडिया कौन्सिलने मार्च २०१९ मध्ये लेखक आणि एकता म्हणून त्यांना राष्ट्रपातळी पुरस्कार देवून गौरविले आहे.

निवडक छायाचित्रे

image
मी उद्योजक होणारच! षण्मुखानंद सभागृह, माटुंगा येथे ३,००० उद्योजकांना संबोधित करताना
image
महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे ६५० पोलीस उपनिरीक्षकांना मार्गदर्शन करताना
image
महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे कार्यशाळेत अधिकाऱ्यांसोबत
image
मला शिवाजी व्हायचंय! पहिली आवृत्ती प्रकाशन सोहळा, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी
image
मला शिवाजी व्हायचंय! दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा स्वप्नील जोशी हस्ते, नेहरू सेंटर, वरळी
image
नाशिक शहराचे पोलीस आयुक्त, श्री. रवींद्र सिंघल सरांसोबतच्या मिटिंग दरम्यान
image
धुळे पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षणार्थीना संबोधित करताना
image
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मध्ये मी उद्योजक होणारच तर्फे सत्कार स्वीकारताना
image
बी. ए. आर. सी. स्टाफला मार्गदर्शन करताना
image
आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना
image
ऑल इंडिया मिडीया कौन्सिल तर्फे लेखक आणि वक्ता म्हणून राष्ट्र पातळी पुरस्कार
image
सिंधुदुर्ग व्यापारी मेळावा, कुडाळ येथे उद्योजकांना मार्गदर्शन करताना

वॉल ऑफ फेम

image
लॉरेन्स अँड मेयो कोल्हापूर आयोजित व्याख्यानाचे न्यूज कव्हरेज
image
वहाळ, चाळीसगाव आणि अर्थसंकेत पुरस्कार सोहळ्याचे कव्हरेज
image
पनवेल येथील करियर मार्गदर्शन कार्यशाळा आणि मला शिवाजी व्हायचंय! पुस्तकाच्या पहिल्या आवृत्ती प्रकाशनाचे कव्हरेज
image
१० पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये झालेल्या कार्यशाळेचे कव्हरेज
image
मोहिते पाटील विद्यालय मानखुर्द माजी विद्यार्थी मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलावलेल्या सोहळ्याचे कव्हरेज
image
मीरा भाईंदर येथील करियर मार्गदर्शन कार्यशाळेचे कव्हरेज
image
मला शिवाजी व्हायचंय! पुस्तक परीक्षण
image
अर्थसंकेत मासिकाने कव्हर केलेली यशोगाथा

Success Stories